Skip to content
1 इतिहास ११:२२-२५

1 इतिहास ११:२२-२५

२२
कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.
२३
एकदा त्याने पाच हात उंचीच्या इजिप्ती मनुष्याला जिवे मारले होते. त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, तरी बेनाइयाह केवळ आपली विणकर्‍याची काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारले.
२४
यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.
२५
इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options