Zibeon बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह
एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.
एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह,
सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)
होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
सेईराचे पुत्र: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान.
शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह.