Whirlwind बद्दल बायबलमधील वचने: Sudden destruction of the wicked
Sudden destruction of the wicked बद्दल वचने
काटेरी झुडूपात लागलेल्या अग्नीची आच तुमच्या भांड्यांना लागण्यापूर्वी— ते हिरवे असो वा वाळलेले—दुष्टही लगेच नाहीसे होतील.
जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.
जरी लोक उचंबळणाऱ्या पाण्याप्रमाणे गर्जना करतात, जेव्हा याहवेह त्यांना दटावतात, तेव्हा ते दूर पळून जातात, टेकड्यांवरील भुश्याप्रमाणे वार्याने पुढे ढकलून दिले जातात, जणू काही वावटळीची धूळ वादळी वाऱ्यासमोर जाते.
लागण करताच, पेरणी करताच, ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.
तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल.
पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल.