Weaving बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा.
याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.
त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्याच्या कामाप्रमाणे विणला.
यानंतर त्यांनी अहरोन व त्याचे पुत्र यांच्यासाठी रेशमी तागाचे विणलेले अंगरखे तयार केले.
आणि ते फणीने घट्ट केल्या. परत ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला व त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.
गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती.
याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.
एकदा त्याने पाच हात उंचीच्या इजिप्ती मनुष्याला जिवे मारले होते. त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, तरी बेनाइयाह केवळ आपली विणकर्याची काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारले.
“माझे दिवस विणकर्याच्या मागापेक्षा वेगवान आहेत, आणि ते आशेविनाच संपतात.
जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील.
मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर पाडले गेले आणि माझ्याकडून काढून घेतले गेले. विणकराप्रमाणे मी माझे जीवन गुंडाळून टाकले आहे, आणि त्यांनी मला विणकऱ्याच्या मागापासून तोडून टाकले आहे; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले.