मुख्य मजकुरावर जा

Under the Law Atonement बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने इस्राएलवरील माझा क्रोध शांत केला आहे. कारण लोकांमधील माझ्या सन्मानाविषयी मी जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो सुद्धा होता म्हणून मी माझ्या ईर्षेने त्यांचा नाश केला नाही.

  2. म्हणून त्याला सांग मी त्याच्याशी शांतीचा करार करीत आहे.

  3. तो व त्याच्या वंशजासाठी हा सर्वकाळच्या याजकपणाचा करार असणार, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या सन्मानासंबंधी ईर्ष्यावान होता आणि इस्राएली लोकांसाठी त्याने प्रायश्चित केले.”

  4. आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.

  5. नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल.

  6. परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.

  7. त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल!

  8. आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!

  9. एवढेच नव्हे, तर परमेश्वरामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अभिमान बाळगतो, त्यांच्याद्वारे आमचा आता समेट झाला आहे.