Skip to content

Trophies बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली.

  2. याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्‍यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.”

  3. दुसर्‍या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे तीन पुत्र पडलेले सापडले.

  4. त्यांनी शौलाचे शिर छेदले आणि त्याचे शस्त्र काढून घेतले आणि त्यांनी ही बातमी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींच्या मंदिरात आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले.

  5. त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शरीर बेथ-शान नगराच्या भिंतीवर टांगले.