मुख्य मजकुरावर जा

Tophet बद्दल बायबलमधील वचने: Jewish children passed through the fire to Molech in

11 वचने · 4 पैलू

Jewish children passed through the fire to Molech in बद्दल वचने

  1. कोणीही आपला पुत्र अथवा कन्या यांचा मोलख दैवताला अग्नीत होम करू नये म्हणून राजाने बेन हिन्नोम खोर्‍यातील तोफेत अशुद्ध केले.

  2. त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.

  3. बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, ज्योतिष आणि जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट अशा अनेक गोष्टी करून याहवेहचा राग पेटविला.

  4. बेन-हिन्नोमच्या खोर्‍यात त्यांनी तोफेत नावाची एक उच्च वेदी बांधली आहे—तिथे त्यांच्या दैवतांना ते आपल्या मुलामुलींचे होमबली देतात—अशी आज्ञा मी त्यांना मुळीच दिली नव्हती, असे भयानक कृत्य माझ्या कधी मनातही आले नाही.

  5. म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्‍याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही.

  6. याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्‍याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील.

  7. आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही.

  8. या ठिकाणी मी हेच करणार व इथे राहणाऱ्या लोकांनाही करेन, ही याहवेहची घोषणा आहे. मी या नगराला तोफेतासारखे करेन.

  9. यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”

  10. नंतर यिर्मयाह तोफेत येथे हा संदेश देऊन परतला, जिथे याहवेहने यिर्मयाहला भविष्यवाणी करण्यासाठी पाठविले होते, तिथे तो मंदिरापुढे थांबला व सर्व लोकांना उद्देशून म्हणाला,

  11. बेन हिन्नोम खोर्‍यांमध्ये त्यांनी बआल दैवतासाठी उंच उंच वेद्या बांधल्या आहेत. तिथे त्यांनी त्यांचे पुत्र व कन्या मोलख मूर्तीस अर्पण केले, हे करण्याचे मी त्यांना कधीही आज्ञापिले नव्हते—असे माझ्या मनातही कधी आले नव्हते—की ते अशी घृणास्पद कृत्ये करतील व यहूदीयास पाप करण्यास लावतील.