मुख्य मजकुरावर जा

Tongues बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील.

  2. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.

  3. मग बंधूंनो व भगिनींनो, आपण काय म्हणावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, त्यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ असलेले गीत किंवा बोधपर शब्द, किंवा प्रकटीकरण, किंवा अन्य भाषा, किंवा अर्थ सांगण्याची प्रत्येकाची तयारी असावी. या सर्वगोष्टी अशा रीतीने व्हाव्या की ज्याद्वारे मंडळीची उन्नती होईल.

  4. कोणी अन्य भाषेत बोलतो, तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन क्रमानुसार, एकजण एकावेळी बोलेल आणि दुसरा अर्थ सांगेल.

  5. पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्‍यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.

  6. यास्तव, माझ्या बंधूंनो व भगिनींनो, संदेश देण्याची उत्कट इच्छा धरा आणि अन्य भाषेतून जे बोलतात त्यांना मना करू नका.