Tola बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
इस्साखारचे पुत्र: तोला, पुवाह, योब व शिम्रोन.
इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: तोलापासून तोलाई कूळ; पुवाहपासून पुनी कूळ;
अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे.
तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.
इस्साखारचे पुत्र: तोला, पुआह, याशूब व शिम्रोन; एकूण चार पुत्र.
तोलाचे पुत्र: उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.