Skip to content

Thorn बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील.

  2. त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय?

  3. काटेरी झुडूपात लागलेल्या अग्नीची आच तुमच्या भांड्यांना लागण्यापूर्वी— ते हिरवे असो वा वाळलेले—दुष्टही लगेच नाहीसे होतील.

  4. मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते, पण जळत्या काटेरी झुडूपांसारखे ते लगेच जळून खाक झाले; याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला.

  5. मूर्खाचे हसणे हे पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे, हे सुद्धा व्यर्थ आहे.

  6. म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन; मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही.

  7. त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.

  8. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”

  9. त्यांनी त्यांना जांभळा झगा घातला आणि काट्यांचा एक मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकावर ठेवला.

  10. सैनिकांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकांवर घातला. त्यांच्या अंगावर जांभळा झगा घातला.

  11. येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!”