मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Issachar बद्दल बायबलमधील वचने: Offering of, at the dedication

6 वचने · 20 पैलू

Offering of, at the dedication बद्दल वचने

  1. दुसर्‍या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.

  2. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  3. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  4. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  5. पापार्पणासाठी एक बोकड;

  6. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.