Skip to content

The Ephod बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “दोन गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावीत.

  2. एका रत्नावर सहा व दुसर्‍यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार ती असावी.

  3. मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी.

  4. आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी.

  5. आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या.

  6. सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या.

  7. सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या.

  8. ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.

  9. जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.”

  10. दावीद म्हणाला, “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, शौल माझ्यामुळे या कईलाह नगराचा नाश करण्यास पाहत आहे, असे तुमच्या दासाने नक्की ऐकले आहे.

  11. कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.” आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.”

  12. पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाहचे लोक मला आणि माझ्या माणसांना शौलाच्या स्वाधीन करतील काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, ते करतील.”