Straight बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
बोलविणार्याचा आवाज म्हणतो: “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली याहवेहसाठी मार्ग तयार करा; आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये महामार्ग सरळ करा,
प्रत्येक दरी उंच केली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; खडबडीत जमीन सपाट होईल, खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.
तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशायाह बोलला होता: “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”
प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे.
“आणि तुमच्या पावलांसाठी मार्ग सरळ करा,” म्हणजे लंगडे पडून अपंग होणार नाही, उलट बरे होतील.