मुख्य मजकुरावर जा

Smith बद्दल बायबलमधील वचने: Genius of, from God

10 वचने · 6 पैलू

Genius of, from God बद्दल वचने

  1. व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  2. सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी;

  3. आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी.

  4. मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे,

  5. आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  6. सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करावे,

  7. आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे.

  8. आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे.

  9. याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.

  10. “पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या व कामास येणारी शस्त्रास्त्रे घडविणाऱ्या लोहाराला मीच उत्पन्न केले आहे. व आपत्ती करणाऱ्या विनाशकाची उत्पत्तीही मीच केली आहे;