Skip to content

Skin बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली.

  2. लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;

  3. त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

  4. “यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे.

  5. मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे.

  6. “मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

  7. “पवित्रस्थानाच्या सेवेसाठी वापरात आणली जाणारी सर्व पात्रे निळ्या कापडात गुंडाळावीत व त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि ती वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावी.

  8. “कास्य वेदीवरील सर्व राख काढावी आणि वेदी जांभळ्या रंगाच्या कापडाने झाकावी.

  9. मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.