मुख्य मजकुरावर जा

Shunammite बद्दल बायबलमधील वचने

30 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली.

  2. मग अलीशा मुलाच्या शरीरावर, तोंडावर तोंड, डोळ्यांवर डोळे, हातांवर हात, अशाप्रकारे उपडा पडला. त्यामुळे मुलाच्या शरीरात पुन्हा ऊब येऊ लागली.

  3. मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्‍या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले.

  4. मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटले, “शूनेमकरीणीला बोलव.” त्याने तिला बोलविल्यावर, तो तिला म्हणाला, “हा घे, तुझ्या पुत्र!”

  5. ती आत आली, त्याच्या पायावर पडली आणि जमिनीपर्यंत लवून तिने त्याला नमन केले. मग तिने आपल्या मुलाला घेतले आणि ती बाहेर पडली.