Skip to content

Shallum बद्दल बायबलमधील वचने

20 वचने · 12 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्‍याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.

  2. यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या एकोणचाळिसाव्या वर्षी याबेशाचा पुत्र शल्लूम इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.

  3. नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.

  4. शल्लूम राजाच्या इतर घटना आणि त्याने केलेला कट यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात केलेली नाही काय?

  5. याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.

  6. एलीयासाहला सिस्माय, सिस्मायास शल्लूम,

  7. शल्लूमास यकम्याह, आणि यकम्याहास एलीशामा झाला.

  8. शौलाचा पुत्र शल्लूम, शल्लूमाचा पुत्र मिबसाम आणि मिबसामचा पुत्र मिश्मा.

  9. द्वारपाल: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता;

  10. शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत.

  11. तव्यावर विश्वासयोग्यतेने ज्या वस्तू भाजण्यात येत, त्यावर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी कोरही शल्लूमचा ज्येष्ठपुत्र मत्तिथ्याहला नेमले.

  12. नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्‍याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला.

  13. हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.

  14. मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,

  15. गायकांपैकी: एल्याशीब हा होता. द्वारपालापैकी: शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.

  16. शल्लूम, अमर्‍याह व योसेफ.

  17. त्याच्या शेजारी यरुशलेमच्या दुसर्‍या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हल्लोहेशचा पुत्र शल्लूमाने व त्याच्या कन्यांनी डागडुजी केली.

  18. मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज: शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे, शोबाईचे, एकूण 138.

  19. शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’

  20. सर्वांना मी याहवेहच्या मंदिरात आणले व इग्दल्याह, परमेश्वराच्या मनुष्याचा पुत्र, हानानाचे पुत्र जी खोली वापरीत असत, त्या खोलीत त्यांना नेले. ही खोली राजवाड्याचे अधिकारी वापरीत असलेल्या खोलीच्या बाजूस आणि मंदिराचा द्वारपाल शल्लूमचा पुत्र मासेयाह, याच्या खोलीच्या बरोबर वर होती.