Sea बद्दल बायबलमधील वचने: Limits of, established by God
Limits of, established by God बद्दल वचने
नंतर परमेश्वराने म्हटले: “अंतराळाखालील जले एकत्र येवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे घडून आले.
त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.
“सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले,
बुधल्यात पाणी भरावे, त्याप्रमाणे ते महासागराचे पाणी एकवटीत आहेत; त्यांच्या भांडारात सागरांचा साठा करीत आहेत.
तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” असे याहवेह विचारतात. “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.