Skip to content

Science बद्दल बायबलमधील वचने

16 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात; आणि पृथ्वी निराधार टांगली आहे.

  2. आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात, तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.

  3. त्यांनी आपले मेघ पसरवून, पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.

  4. त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.

  5. परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.

  6. आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात; आणि आपल्या बुद्धीच्या बलाने राहाबाचे तुकडे तुकडे करतात.

  7. केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्‍या सर्पाला विंधले आहे.

  8. परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”

  9. आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे!

  10. सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्‍यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत.

  11. जे वाकडे आहे, ते सरळ करता येत नाही; जी उणीव आहे, ती मोजता येत नाही.

  12. मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.”

  13. मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्‍याचा पाठलाग केल्यासारखे आहे.

  14. “तुम्हा नियमशास्त्र तज्ञांना धिक्कार असो, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली. तुम्ही स्वतः प्रवेश करत नाही व जे प्रवेश करू पाहतात त्यांनाही अडखळण करता.”

  15. नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते.

  16. हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.