Reconciliation बद्दल बायबलमधील वचने: Between man and man
Between man and man बद्दल वचने
“यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत असाल आणि तिथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काहीतरी आहे,
तर तुमची भेट तिथेच वेदीपुढे ठेवा. आधी जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा.
“तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करेल आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल.
मी तुम्हाला निश्चित सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.