मुख्य मजकुरावर जा

Prayerlessness बद्दल बायबलमधील वचने

15 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो.

  2. तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.

  3. हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’

  4. सर्वसमर्थामध्‍ये त्यांना संतोष मिळणार काय? सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय?

  5. दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.

  6. दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील. ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत.

  7. अशा राष्ट्रांवर, जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात, जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत; अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.

  8. “परंतु याकोबा, तू माझा धावा केला नाही, इस्राएला, तुम्ही माझ्यासाठी स्वतःला थकविले नाही.

  9. तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही किंवा तुमचा ध्यास घेत नाही; कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे.

  10. माझे मेंढपाळ असमंजस आहेत कारण ते याहवेहचे मार्गदर्शन घेत नाहीत; म्हणून ते समृद्ध होत नाहीत आणि त्यांच्या सर्व कळपांची पांगापांग होते.

  11. या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा जे तुमचा अधिकार मान्य करीत नाहीत, जे लोक तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत. त्यांनी याकोबाला गिळले आहे; त्याला संपूर्णपणे गिळंकृत केले आहे आणि त्यांच्या मातृभूमीचा नायनाट केला आहे.

  12. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही.

  13. ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत; ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातील कोणी मला हाक मारीत नाही.

  14. तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.”

  15. जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”