Pottery बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे— एक जो सूर्योदयाकडून येतो आणि माझ्या नावाचा धावा करतो. तो राज्यकर्त्यांना तुडवेल, जणू ते बांधकामाचा चुना आहेत, जणू तो माती तुडविणारा कुंभार आहे.
म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला.
परंतु तो जे मडके करीत होता, त्याच्या हातातील मातीचा आकार बिघडला; म्हणून त्याने त्याचे, त्याला योग्य वाटेल तसे दुसरे मडके बनविले.
म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात.
हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले,
आणि प्रभूने मला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.”