Skip to content

Pledge बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्याने म्हटले, “मी तुला माझ्या कळपातून एक कोवळी शेळी पाठवून देईन.” तेव्हा तिने विचारले, “ती पाठवेपर्यंत तुम्ही माझ्याकडे कोणते तारण ठेवणार आहात?”

  2. “तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले. तिने उत्तर दिले, “तुमची मुद्रिका, गोफ आणि हातातील काठी.” याप्रमाणे त्याने या वस्तू तिला दिल्या आणि तिने त्याला आपल्याशी रत होऊ दिले, परिणामी ती गर्भवती झाली.

  3. यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले.

  4. यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही.

  5. जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्‍याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,

  6. तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्‍याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे.

  7. जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका.

  8. गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.