मुख्य मजकुरावर जा

Plague बद्दल बायबलमधील वचने: Foretold

7 वचने · 3 पैलू

"Plague" साठी शोधा

Foretold बद्दल वचने

  1. त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे.

  2. आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिले: अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला.

  3. ज्यांना पृथ्वीवर सात पीडा ओतण्याचे काम नेमून देण्यात आले होते, ते सात देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्यांनी डागविरहीत आणि तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केली होती; त्यांच्या छातीवर सोन्याचे पट्टे बांधले होते.

  4. त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, त्या सात देवदूतांना युगानुयुग जिवंत असणार्‍या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या सात सोन्याच्या वाट्या दिल्या.

  5. त्यांचे गौरव व सामर्थ्य यातून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. सात देवदूतांचे सात पीडा ओतण्याचे काम संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.

  6. या पुस्तकातील संदेश ऐकणार्‍या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल.

  7. तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील.