मुख्य मजकुरावर जा

Philosophy बद्दल बायबलमधील वचने: Employment of, was not Paul's method of preaching the gospel

9 वचने · 5 पैलू

Employment of, was not Paul's method of preaching the gospel बद्दल वचने

  1. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्याकरिता नव्हे, तर शुभवार्तेचा प्रचार करण्याकरिता पाठविले आहे—वाक्पटुतेने व ज्ञानाने नव्हे, यामुळे असे न होवो की ख्रिस्ताच्या क्रूसाचे सामर्थ्य रिक्त व्हावे.

  2. कारण असे लिहिले आहे: “ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करेन. बुद्धिमानाची बुद्धी मी निष्फळ करेन.”

  3. कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्‍या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले.

  4. बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्याबाबतीत तसेच झाले, जेव्हा मी तुम्हाकडे आलो, तेव्हा परमेश्वराची साक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मानवी ज्ञान आणि वक्तृत्व घेऊन आलो नाही.

  5. कारण मी असा निश्चय केला होता की तुम्हामध्ये असताना फक्त क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी जाणून घेऊ नये.

  6. मी तुमच्याकडे अशक्त, अतिशय भीतभीत व कापत आलो.

  7. माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे होते.

  8. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.

  9. आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.