Skip to content

Pantomime बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.

  2. तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,

  3. “आता हे मानवपुत्रा, ओल्या मातीची एक वीट घे आणि ती तुझ्यापुढे ठेव व तिच्यावर यरुशलेम शहराचे चित्र काढ.

  4. नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ.

  5. नंतर एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व शहरामध्ये लोखंडी भिंतीप्रमाणे ठेव आणि आपले तोंड त्याकडे कर. ती वेढ्यात आहे आणि तू तिला वेढा देशील. हे इस्राएली लोकांस एक चिन्ह म्हणून असेल.

  6. “त्यानंतर तू आपल्या डाव्या कूशीवर पड आणि इस्राएली लोकांचे पाप आपल्या स्वतःवर ठेव. जितके दिवस तू एका कूशीवर पडशील तितके दिवस त्यांच्या पापाचा भार तू वाहशील.

  7. त्यांच्या पापाच्या वर्षांइतके दिवस मी तुला ठरवून देत आहे. म्हणून तीनशे नव्वद दिवस तू इस्राएली लोकांच्या पापाचा भार वाहशील.

  8. “हे संपवल्यानंतर, परंतु यावेळी आपल्या उजव्या कूशीवर तू पुन्हा पड आणि यहूदीयाच्या लोकांच्या पापाचा भार वाहा. त्यासाठी प्रत्येक वर्षासाठी एक दिवस असे चाळीस दिवस मी तुला नेमून दिले आहेत.

  9. मग तू यरुशलेमच्या वेढ्याकडे तोंड वळव आणि उघड्या हातांनी तिच्याविरुद्ध भविष्य सांग.

  10. मी तुला दोर्‍यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्‍या कूशीवर वळू शकणार नाहीस.

  11. “मानवपुत्रा, थरथर कापत आपले अन्न खा आणि आपले पाणी पिताना ते भीतीने पी.

  12. आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ”