Skip to content

Ostriches बद्दल बायबलमधील वचने: General references

10 वचने · 3 पैलू

General references बद्दल वचने

  1. “जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्‍याशी त्यांची तुलना करता येत नाही तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात.

  2. ती धुळीत आपली अंडी देते आणि वाळूमध्ये ती उबविते,

  3. एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील, किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही.

  4. ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत; तिच्या प्रसूती वेदना व्यर्थ गेल्या याचे तिला काहीच वाटत नाही,

  5. कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही.

  6. परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते, तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते.

  7. परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील, तरसानी तिची घरे भरून जातील; तिथे घुबडे राहतील, आणि तिथे बोकडे उड्या मारतील.

  8. काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, घुबडांचे घर होईल.

  9. रानातील हिंस्र श्वापदे कोल्हे आणि घुबडे माझा आदर करतात, कारण मी अरण्यात त्यांना जलपुरवठा करतो माझ्या त्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी, ओसाड भूमीत झरे बनवितो,

  10. कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत.