मुख्य मजकुरावर जा

Nile बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे आखात कोरडे करतील; होरपळणाऱ्या वाऱ्याने ते फरात नदीवर हात झटकून टाकतील. ते त्याचे सात ओढे पाडतील जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.

  2. नदीचे पाणी वाळून जाईल, आणि नदीचे पात्र कोरडे आणि शुष्क होईल.

  3. कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,

  4. तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.

  5. जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील.

  6. जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील.

  7. कापडकामाचे कारागीर उदास होतील, आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील.

  8. प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.

  9. आता इजिप्तकडे कशाला जाता नील नदीचे पाणी पिण्यासाठी काय? आणि अश्शूराकडे का जावे फरात नदीचे पाणी पिण्यासाठी काय?

  10. मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझ्या प्रवाहातील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील असे मी करेन. मी तुला तुझ्या प्रवाहातून ओढून बाहेर काढेन आणि त्यातील सर्व मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.

  11. “यामुळे पृथ्वी थरथर कापणार नाही काय, आणि तिच्यात राहणारे सर्व शोक करणार नाहीत काय? संपूर्ण पृथ्वी नाईल नदीसारखी उठेल; ती नील नदीप्रमाणे खवळेल आणि मग इजिप्तच्या नदीप्रमाणे बुडून जाईल.