मुख्य मजकुरावर जा

Nethaneel बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.

  2. लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.

  3. ओबेद-एदोमासही पुत्र होते: शमायाह प्रथमपुत्र, यहोजाबाद दुसरा, योवाह तिसरा, साखार चवथा, नथानेल पाचवा,

  4. त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याचे अधिकारी बेन-हेल, ओबद्याह, जखर्‍याह, नथानेल आणि मिखायाह यांना यहूदीयाच्या गावांमध्ये शिकविण्यासाठी पाठवले.

  5. तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली.

  6. पशहूराचे वंशज: एलिओएनाइ, मासेयाह, इश्माएल, नथानेल, योजाबाद व एलासाह.

  7. हशब्याह, हिल्कियाह कुळाचा प्रमुख; नथानेल, यदायाह कुळाचा प्रमुख.

  8. त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता.