Skip to content

Muster बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते.

  2. नंतर राजाने अमासाला म्हटले, “तीन दिवसात यहूदीयाच्या लोकांना माझ्याकडे जमा कर आणि तू स्वतः देखील हजर हो.”

  3. पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले.

  4. जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि पाच राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने नेले.

  5. ऐका, डोंगरावरील एक आवाज, मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज! ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ, राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज! सर्वसमर्थ याहवेह, युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत.