मुख्य मजकुरावर जा

Mob बद्दल बायबलमधील वचने

15 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले.

  2. लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले.

  3. समुदायापुढे स्वतः जावे, असे पौलाच्या मनात होते, परंतु शिष्य त्याला तसे करू देईनात.

  4. त्या प्रांतातील काही अधिकारी, पौलाचे मित्र, यांनी देखील त्याला निरोप पाठविला व नाटकगृहात प्रवेश करू नये अशी त्याला विनंती केली.

  5. सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते.

  6. काही यहूद्यांनी आलेक्सांद्राला पुढे ढकलले, मग आलेक्सांद्राने लोकांपुढे बचावाचे भाषण करण्यासाठी, शांत व्हावे म्हणून हाताने खुणावले.

  7. परंतु तो यहूदी आहे हे समजल्यावर, सुमारे दोन तास, “इफिसकरांची अर्तमीस थोर!” अशी आरोळी ते एका सुरात मारीत राहिले.

  8. सरतेशेवटी नगर लेखनिकाने जमावाला शांत करून म्हटले: “इफिसच्या नागरिकांनो, स्वर्गातून खाली पडलेल्या त्या थोर अर्तमीसच्या मूर्तीचे व मंदिराचे संरक्षक इफिस शहर आहे, हे सर्व जगाला माहीत नाही का?

  9. तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका.

  10. तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही.

  11. जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात.

  12. जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील.

  13. वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.”

  14. ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.”

  15. तेव्हा सर्व शहर खळबळून गेले आणि सर्व बाजूंनी लोक धावत आले. पौलाला जबरदस्तीने पकडून मंदिरातून ओढून काढण्यात आले आणि तत्काळ दरवाजे बंद करण्यात आले.