Aristarchus
Aristarchus चा उल्लेख असलेली वचने
लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले.
त्याच्याबरोबर बिरुया मध्ये राहणारा पुर्राचा पुत्र सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस व तीमथ्य देखील, तसेच आशिया प्रांतातील तुखिक व त्रोफिम होते.
तेव्हा आशियाच्या प्रांतातील किनार्यावरील अनेक बंदरावर थांबत जाणार्या व अद्रमुत्तीय शहरापासून निघालेल्या जहाजात बसून आम्ही समुद्राकडे निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथील रहिवासी अरिस्तार्ख नावाचा एक मनुष्य आमच्याबरोबर होता.
माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.
आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.