Messenger बद्दल बायबलमधील वचने: Figurative
Figurative बद्दल वचने
मग याहवेहचा संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहने लोकांना संदेश पाठविला: “मी तुम्हाबरोबर आहे,” याहवेह जाहीर करतात.
“याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात.
“मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
“पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन.
तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.”
हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “ ‘मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल.’
यशायाह संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन, तो तुझा मार्ग तयार करेल,”
हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि, तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल,