Skip to content

Memphis बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; तिच्या लोकांच्या कोनशिलांनी इजिप्तला भरकटून टाकले आहे.

  2. मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे.

  3. “इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’

  4. इजिप्तमधील रहिवाशांनो, सामानाची बांधाबांध करा, कारण मेम्फीस शहराचा नाश होणार आहे व ते ओसाड होऊन एक निर्जन स्थान होईल.

  5. मी इजिप्तला आग लावेन; सीन वेदनांनी तळमळेल. नओ वादळात उडून जाईल; मेम्फीस सातत्याने कष्टात राहील.

  6. जरी ते नाशापासून सुटले तरी इजिप्त त्यांना गोळा करेल, आणि मेम्फीस त्यांना मूठमाती देतील. काटेकुसळे त्यांच्या चांदीच्या वस्तू नेतील, आणि त्यांच्या तंबूत काटेरी झाडे उगवतील.