Matthias बद्दल बायबलमधील वचने: Surnamed Justus, chosen as an apostle in the place of Judas.
Surnamed Justus, chosen as an apostle in the place of Judas. बद्दल वचने
त्या दिवसांमध्ये पेत्र विश्वासणार्या लोकांमध्ये उभा राहिला (ते एकूण एकशेवीस लोक होते) आणि त्याने भाषण दिले.
तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते.
तो आपल्यापैकीच एक होता आणि त्याने आपल्या सेवाकार्यामध्ये भाग घेतला होता.”
यहूदाहने त्याला मिळालेल्या दुष्टाईच्या पैशाने शेत विकत घेतले; तिथे तो डोक्यावर पडला, त्याचे पोट फुटून सर्व आतडी बाहेर पडली.
ही वार्ता यरुशलेमात राहणार्या सर्वांना समजली, तेव्हापासून त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले.
“यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे: “ ‘त्याचे ठिकाण ओसाड पडो; व त्यात कोणीही वस्ती न करो,’ आणि, “ ‘त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.’
यास्तव हे आवश्यक आहे की अशा व्यक्तींपैकी एकाची निवड आपण करावी की, जो प्रभू येशू आपल्यामध्ये राहत होते त्या वेळेपासून आतापर्यंत सर्व वेळ आपल्याबरोबर राहात आलेला आहे,
प्रारंभीपासून म्हणजे योहानाकडून येशूंचा बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून येशूंना स्वर्गात घेतले जाईपर्यंत, कारण यांच्यामधून एकाने आपल्याबरोबर येशूंच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार असणे आवश्यक आहे.”
तेव्हा त्यांनी यूस्त म्हटलेला योसेफ, ज्याला बारसब्बास देखील म्हणत असत आणि मत्थिया अशा दोन माणसांची नावे सुचविली.
नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा,
ही प्रेषितीय सेवा, नियोजित स्थानी गेलेल्या यहूदाहने सोडली.”
नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली.