Longevity बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
म्हणून परमेश्वराने त्याला म्हटले, “कारण तू तुझ्यासाठी दीर्घायुष्य किंवा संपत्ती किंवा तुझ्या शत्रूंचा नाश हे न मागता न्याय करण्यासाठी विवेक मागितला आहे,
त्यामुळे तू जे मागितले आहेस ते मी करेन. मी तुला ज्ञानी व विवेकी हृदय देईन, म्हणजे तुझ्यासारखा पूर्वी कधी कोणी नव्हता, ना कधी असेल.
याशिवाय, तू जे मागितले नाहीस ते म्हणजे संपत्ती आणि सन्मान हे देखील मी तुला देईन—आणि तुझ्या आयुष्याच्या दिवसांत राजांमध्ये तुझ्यासमान कोणीही नसेल.
आणि तुझा पिता दावीद करीत असे त्याचप्रमाणे जर तू माझ्या आज्ञेनुसार चालून माझे नियम आणि विधी पाळशील, तर मी तुला दीर्घायुष्य देईन.”
माझ्या लेकरांनो या आणि माझे ऐका; याहवेहचे भय कसे धरावे, हे मी तुम्हाला शिकवेन.
तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,
तर तू आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.
माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस, परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;
कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील, आणि तुला शांती आणि समृद्धी देतील.
त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती.
आणि चौर्याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.
कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे.
त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.