Hazael बद्दल बायबलमधील वचने: Conspires against, murders, and succeeds to the throne of Ben-Hadad
Conspires against, murders, and succeeds to the throne of Ben-Hadad बद्दल वचने
राजाने हजाएलला म्हटले, “एखादी भेट घेऊन परमेश्वराच्या मनुष्याला भेटण्यास जा आणि त्याच्याद्वारे याहवेहस विचार, ‘मी या आजारातून बरा होईन की नाही?’ ”
हजाएल त्याच्यासोबत दिमिष्कच्या सर्व उत्तम भेटवस्तू चाळीस उंटावर लादून अलीशाला भेटण्यासाठी गेला. तो गेला आणि त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हटले, “तुमचा पुत्र, अरामचा राजा बेन-हदाद, यांनी मला आपल्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, मी या आजारातून बरा होईन की नाही?”
अलीशाने उत्तर दिले, “जा आणि त्याला सांग, ‘तू नक्कीच बरा होशील.’ परंतु याहवेहने मला स्पष्ट दाखविले आहे की तो अवश्य मरेल.”
यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला.
हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” अलीशाने उत्तर दिले, “कारण मला माहीत आहे की तू इस्राएली लोकांचे वाईट करणार आहेस, तू त्यांच्या तटबंदीच्या ठिकाणास आग लावशील, त्यांच्या तरुण पुरुषांना तलवारीने ठार मारशील, त्यांच्या बालकांना आपटून मारशील आणि गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”
हजाएल म्हणाला, “तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट कशी करणार?” अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,”
त्यानंतर हजाएल अलीशाला सोडून गेला आणि आपल्या स्वामीकडे परत आला. जेव्हा बेन-हदादने विचारले, “अलीशाने तुला काय सांगितले?” हजाएलाने उत्तर दिले, “त्यांनी मला सांगितले की तुम्ही नक्कीच बरे होणार.”
परंतु दुसर्या दिवशी त्याने एक रजई पाण्यात भिजविली आणि ती राजाच्या तोंडावर पसरली, त्यामुळे राजा मरण पावला. त्यानंतर हजाएल त्याच्या ठिकाणी राजा झाला.