Skip to content

Harvest बद्दल बायबलमधील वचने

15 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. (आता जवस व सातू या पिकांचा पूर्णपणे नाश झाला होता, कारण सातू कापणीला आला होता व जवसाला फुले आली होती.

  2. पण गहू व खपल्याचा गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अजून पिकले नव्हते.)

  3. “ ‘शब्बाथाच्या दुसर्‍या दिवशी, तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुढे पूर्ण सात आठवडे मोजावे.

  4. पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे.

  5. तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे.

  6. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.

  7. सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत.

  8. मी यहूदीयाच्या प्रतिष्ठितांना फटकारून विचारले, “तुम्ही हे काय दुराचरण करीत आहात—शब्बाथ भ्रष्ट करीत आहात?

  9. तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.”

  10. यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये.

  11. सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली.

  12. पण मी त्यांना ताकीद दिली आणि म्हणालो, “तुम्ही येथे तटाजवळ रात्र का घालविली? परत असे काही केले, तर मी तुम्हाला अटक करेन.” मग त्या दिवसानंतर परत ते शब्बाथ दिवशी आले नाही.

  13. नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा.

  14. सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.

  15. खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील.