मुख्य मजकुरावर जा

Gadarenes बद्दल बायबलमधील वचने: Called also Gergesenes, Jesus visits and works miracles among, but is rejected.

26 वचने · 1 पैलू

Called also Gergesenes, Jesus visits and works miracles among, but is rejected. बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सरोवराच्या पलीकडे गदरेकरांच्या देशात येशू आले, तेव्हा भुताने पछाडलेले दोन मनुष्य कबरस्तानातून धावत आले व त्यांना भेटले. ती माणसे इतकी हिंसक होती की त्या परिसरातून कोणालाही जाणे शक्य नव्हते.

  2. येशूंना पाहून ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला आमच्याशी काय काम? ठरलेल्या वेळेपूर्वीच तुम्ही आम्हाला छळण्यास आले आहे का?”

  3. दूर अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.

  4. भुतांनी येशूंना विनंती केली, “तुम्ही आम्हाला हाकलून देणार असाल तर आम्हाला डुकरांमध्ये जाण्याची परवानगी द्या.”

  5. येशू म्हणाले, “जा.” तत्काळ भुते बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली व तो सर्व कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात बुडून मेला.

  6. डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात धावत गेले आणि त्यांनी ही बातमी सर्वांना सांगितली. भुतग्रस्तांच्या बाबतीत काय घडले हे त्यांनी लोकांना सांगितले.

  7. तेव्हा नगरातील सर्व लोक येशूंना भेटण्यास गेले आणि त्यांना भेटल्यावर, त्यांच्या भागातून निघून जावे अशी येशूंना विनंती केली.

  8. ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या प्रांतात आले.

  9. येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला.

  10. हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते.

  11. बरेचदा त्याचे हात व पाय साखळदंडाने बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले व पायातील लोखंडाच्या बेड्यांचे तुकडे केले. त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद कोणातही नव्हती.

  12. दिवस आणि रात्र तो स्वतःला दगडांनी ठेचून घेई व थडग्यामध्ये आणि डोंगरामधून मोठमोठ्याने ओरडत असे.

  13. येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला,

  14. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस.”

  15. कारण येशूंनी त्याला म्हटले होते, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये.”

  16. “तुझे नाव काय?” येशूंनी विचारले, त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत.

  17. आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस,” अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली.

  18. त्याचवेळी डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.

  19. “आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे.” अशी भुतांनी येशूंना विनंती केली.

  20. येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाले आणि डुकरांमध्ये शिरले व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला.

  21. डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले.

  22. जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले जो भुताच्या सैन्याने पछाडलेला होता तो बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले.

  23. प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले आणि डुकरांच्या बाबतीत काय झाले, ते सर्वांना सांगितले.

  24. तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली.

  25. येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली.