मुख्य मजकुरावर जा

Forgetting God बद्दल बायबलमधील वचने

14 वचने · 19 पैलू

"Forgetting God" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल,

  2. आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल,

  3. तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल.

  4. तो वाढतो पण कापला जात नाही, गवतापेक्षा तो लवकर सुकून जातो.

  5. जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो; देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते.

  6. आमच्यावर हे प्रसंग आले असताना आम्ही तुम्हाला विसरलो नाही; आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता.

  7. आम्ही तुम्हाला सोडले नाही; तुमच्या मार्गातून आमचे पाय ढळले नाही.

  8. पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले. तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे.

  9. जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो, किंवा अन्य दैवतांपुढे हात पसरविले असते,

  10. तुम्ही तुमचे तारणकर्ते परमेश्वरांना विसरले आहात; तुम्ही तुमचा दुर्ग, तुमच्या खडकाची आठवण केली नाही. जरी तुम्ही अत्युत्तम झाडांची लागवड केली आहे, आणि विदेशी द्राक्षवेलींची लागवड केली आहे,

  11. ज्या दिवशी तुम्ही त्यांना लावता, तुम्ही त्यांना वाढविता, आणि सकाळी तुम्ही त्यांची पेरणी करता, तेव्हा तुम्ही त्यांना अंकुर फुटू देता, तरीसुद्धा रोग आणि असाध्य वेदना होणाऱ्या दिवसामध्ये त्यांचे काहीच उत्पादन होणार नाही.

  12. तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता, ज्यांनी आकाश ताणून पसरले आणि ज्यांनी पृथ्वीचा पाया घातला, तुम्ही सतत दहशतीखाली का जगता दिवसभर विरोधकांच्या क्रोधाच्या भीतीत का राहता? कारण त्यांनी तुमचा नाश करण्याचा निर्धार केला आहे? विरोधकांचा क्रोध कुठे आहे?

  13. भीतीने थिजलेल्या बंदिवानांची लवकरच सुटका होईल; ते त्यांच्या अंधारकोठडीत मरणार नाहीत, त्यांना भाकरीची उणीव भासणार नाही.

  14. कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो लाटांनी गर्जना करावी म्हणून समुद्र ढवळतो— सर्वसमर्थ याहवेह हे त्याचे नाव आहे.