Skip to content

Flesh बद्दल बायबलमधील वचने

16 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”

  2. यास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?”

  3. येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही.

  4. जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.

  5. कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे.

  6. जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो.

  7. मला पाठविणार्‍या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल.

  8. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.”

  9. येशूंनी हे शिक्षण कफर्णहूमातील सभागृहामध्ये दिले.

  10. हे ऐकून, त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळजण म्हणाले, “ही शिकवण अवघड आहे. हे कोण स्वीकारू शकेल?”

  11. त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का?

  12. तर मग मानवपुत्राला, जिथे ते पूर्वी होते तिथे वर चढून जाताना पाहाल!

  13. फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.

  14. देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा,

  15. मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट,

  16. हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.