मुख्य मजकुरावर जा

Firstborn बद्दल बायबलमधील वचने: Of man and beast, reserved to Himself by God

16 वचने · 5 पैलू

Of man and beast, reserved to Himself by God बद्दल वचने

  1. तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत.

  2. गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव.

  3. “भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले.

  4. जेव्हा फारोह हट्टाने आम्हाला जाऊ देत नव्हता, तेव्हा याहवेहने संपूर्ण इजिप्त देशातील लोकांचे व जनावरांचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. म्हणून प्रत्येक उदरातून प्रथम जन्मलेला नर आम्ही याहवेहला समर्पित करतो आणि ते आम्ही खंडणी भरून सोडवितो.’

  5. आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.”

  6. “आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा.

  7. बैल व मेंढे यांच्याविषयी सुद्धा असेच करावे. त्यांना सात दिवस त्यांच्या आईजवळ राहू द्यावे, परंतु आठव्या दिवशी ते मला द्यावे.

  8. “प्रत्येक उदरातील प्रथम जन्मलेला, तुमच्या गुरातील सर्व प्रथम जन्मलेले नर, मग ते खिल्लारातील असो किंवा मेंढरांतील असो माझे आहेत.

  9. गाढवाचे प्रथमवत्स कोकरू देऊन खंडणी भरून सोडवून घ्यावा, परंतु तो जर तुम्ही खंडणी भरून सोडविला नाही तर, त्याची मान मोडावी. तुमच्या सर्व प्रथम पुत्रांना खंडणी भरून सोडवावे. “कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाताने येऊ नये.

  10. इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे.

  11. आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.

  12. तुमच्या गुरांचे आणि शेरडामेंढरांचे प्रथम जन्मलेले नर, याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही पवित्र म्हणून वेगळे ठेवावेत. तुमच्या गुरांचे प्रथमवत्स तुम्ही शेतीच्या कामासाठी वापरू नयेत आणि तुमच्या मेंढरांच्या प्रथम वत्साची लोकर कातरू नये.

  13. प्रत्येक वर्षी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर, ते जे स्थान निवडतील त्या ठिकाणी त्यांचे मांस खावे.

  14. तरी, त्या प्राण्यात काही दोष आढळल्यास, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असेल किंवा त्यामध्ये कोणतेही व्यंग असले तर याहवेह तुमच्या परमेश्वराला त्याचे अर्पण करू नये.

  15. ते तुम्ही आपल्याच नगरात खावे. हरिण किंवा सांबर खातात त्याप्रमाणेच, विधीनुसार अशुद्ध व शुद्ध यांनी ते खावे;

  16. परंतु तुम्ही त्याच्या रक्ताचे सेवन करू नये; तर ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून द्यावे.