Figurative Way बद्दल बायबलमधील वचने: Of holiness
Of holiness बद्दल वचने
तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.
आणि तिथे एक महामार्ग असेल; त्याला पवित्रतेचा मार्ग म्हटले जाईल; तो त्यांच्यासाठी असेल जे त्या पवित्र मार्गावरून चालतात. अशुद्ध असलेले त्यावरून प्रवास करणार नाहीत. दुष्ट मूर्ख लोक त्यावरून चालणार नाहीत.
तिथे कोणताही सिंह नसेल, किंवा कोणताही वखवखलेला हिंस्र पशू नसेल. ते तिथे सापडणार नाहीत. फक्त तारण झालेलेच तिथे चालतील,
याहवेह असे म्हणतात: “चौरस्त्यावर उभे राहा व पाहा; पुरातन मार्गाची विचारणा करा, तो चांगला मार्ग कुठे आहे ते विचारा आणि त्या मार्गाने जा, तसे केल्यास तुमच्या आत्म्याला शांती लाभेल. परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही त्या मार्गाने चालणार नाही.’
कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; नीतिमान त्यावरून चालतील, पण पातकी त्यावर अडखळून पडतील.