Skip to content

Earth बद्दल बायबलमधील वचने

58 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूती वेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे.

  2. ते असेही म्हणाले, “हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.

  3. ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील.

  4. तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार; आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील. परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.”

  5. परंतु चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जना करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी उघड्या पडतील.

  6. ज्याअर्थी सर्वकाही अशा रीतीने नष्ट होणार आहे, त्याअर्थी तुम्ही कशाप्रकारचे लोक असणे आवश्यक आहे? तुम्ही पवित्र आणि सुभक्तीत जीवन जगले पाहिजे.

  7. तो परमेश्वराचा दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष देत आहात, त्या दिवशी आकाश अग्नीत जळून विलयास जाईल आणि त्यातील मूलतत्वे उष्णतेने वितळतील.

  8. परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नव्या पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत.