Skip to content

Deceit बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात.

  2. जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते.

  3. त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल.

  4. जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.

  5. लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.

  6. म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय?

  7. त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात.

  8. अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” अशी याहवेह घोषणा करतात. “या अशा राष्ट्रावर मी स्वतः सूड उगवू नये काय?”