Skip to content

Creeping Things बद्दल बायबलमधील वचने

20 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. चार पाय असलेले उडणारे कीटक तुम्ही खाऊ नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध समजले जातात.

  2. तरीसुद्धा उडणारे कीटक, जे त्यांच्या चारही पायांवर चालतातः जमिनीवर उड्या मारण्याकरिता ज्यांच्या पायांवर एकजोड असतो, ते तुम्ही खाऊ शकता.

  3. उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत.

  4. मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत.

  5. जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे,

  6. घोरपड, घुशी, पाल, मगर, गोगलगाय व गुहिर्‍या सरडा.

  7. जमिनीवर सरपटणार्‍यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

  8. त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; काष्ठपात्रे, वस्त्रे, कातडे, गोणपाट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; नंतर ते शुद्ध होईल.

  9. त्यापैकी एखादा प्राणी मातीच्या पात्रात पडला, तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.

  10. अशाप्रकारे अशुद्ध झालेली वस्तू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा जर एखाद्या पदार्थाला स्पर्श झाला, तर ते सर्व अशुद्ध समजावे. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध आहे.

  11. अशा प्राण्यांच्या मृत शरीराचा स्पर्श चुलीला किंवा एखाद्या भांड्याला झाला तर ते अशुद्ध होय. अशा अशुद्ध चुलीचा व भांड्याचा नाश करावा.

  12. जर एखाद्या प्राण्याचे मृतदेह पाणी असलेल्या एखाद्या झर्‍यात किंवा हौदात पडले, तरी ते पाणी शुद्धच राहते. तरीपण जो त्या मृत शरीराला स्पर्श करेल त्याला अशुद्ध समजावे.

  13. जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते;

  14. पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

  15. तुम्हाला खाण्यास मोकळीक असलेला प्राणी आजारी पडून मेला, तर अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो कोणी स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  16. त्याचप्रमाणे जो कोणी त्या प्राण्याचे मांस खाईल किंवा त्याचे मृतदेह वाहून नेईल, त्याने आपली वस्त्रे धुवावीत; तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  17. जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत. ते खाऊ नयेत.

  18. जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत.

  19. झुंडीने राहणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करून तुम्ही अशुद्ध होऊ नये. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका.

  20. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.