Compromise बद्दल बायबलमधील वचने: Before litigation, enjoined
Before litigation, enjoined बद्दल वचने
ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील?
जर तू तुझ्या शेजार्याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस,
नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल.
“तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करेल आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल.
मी तुम्हाला निश्चित सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.
ज्यावेळी तुम्ही शत्रूबरोबर न्यायालयात जाण्यापूर्वी वाटेत एकत्रित असतानाच संबंध नीट करा, नाहीतर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश अधिकार्याच्या हाती सोपवून देईल आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकेल.
मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.”