Cities of Refuge बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“ ‘जर कोणा व्यक्तीने लोखंडी वस्तूने एखाद्यावर घातक हल्ला केला, तर तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
किंवा कोणी दगड घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
किंवा कोणी लाकडी वस्तू घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; त्या खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
रक्ताचा सूड घेणार्याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्याने खुनी मनुष्याला जिवे मारावे.
जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले
किंवा जर वैरभावाने एखाद्याला बुक्की मारली व तो मेला, तर त्या व्यक्तीला मारून टाकले जावे; कारण तो खुनी आहे. रक्ताचा सूड घेणारा जेव्हा त्या खुनी व्यक्तीला भेटेल तेव्हा त्याने त्याला अवश्य जिवे मारावे.
नंतर मोशेने यार्देनेच्या पूर्वेस तीन शहरे नेमली;
ती यासाठी की, जर कोणी चुकून एखाद्या व्यक्तीची हत्या केली, त्याने पूर्व कल्पना नसताना एखाद्या शेजार्याला अनावधानाने मारले तर त्याला सुरक्षिततेसाठी त्या शहरात पळून जाता येईल. तो यापैकी एका शहरात पळून जाऊन आपला जीव वाचवू शकतो.
ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.