Cities of Refuge बद्दल बायबलमधील वचने: Names &c of
Names &c of बद्दल वचने
नंतर मोशेने यार्देनेच्या पूर्वेस तीन शहरे नेमली;
ती यासाठी की, जर कोणी चुकून एखाद्या व्यक्तीची हत्या केली, त्याने पूर्व कल्पना नसताना एखाद्या शेजार्याला अनावधानाने मारले तर त्याला सुरक्षिततेसाठी त्या शहरात पळून जाता येईल. तो यापैकी एका शहरात पळून जाऊन आपला जीव वाचवू शकतो.
ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.