Choice बद्दल बायबलमधील वचने: The sinner's
The sinner's बद्दल वचने
आकाश आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, आशीर्वाद आणि शाप, ही ठेवली आहेत. म्हणून तुम्ही जीवन निवडून घ्यावे म्हणजे तुम्ही आणि तुमची मुले जिवंत राहतील,
आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, त्यांची वाणी ऐकावी आणि त्यांना बिलगून राहावे. कारण याहवेहच तुमचे जीवन आहेत आणि अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या देशात तेच तुम्हाला दीर्घायुष्य देतील.
परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.”
तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो!
याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले.
आणि याहवेहने जे अमोरी लोक त्या देशात राहत होते त्यांच्यासहित सर्व राष्ट्रांना आमच्या समोरून बाहेर घालवून दिले. आम्हीही याहवेहचीच सेवा करणार, कारण ते आमचे परमेश्वर आहेत.”